YCM Education मध्ये आपले हार्दिक स्वागत!


|| शिका आपल्या गतीने, यश मिळवा खात्रीने ||

YCM Education हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन classes मार्गदर्शन व अध्यापन देणारे एक विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ आहे.

अनेक विद्यार्थी YCMOU मध्ये दुसरी पदवी (Second Degree) मिळवण्यासाठी प्रवेश घेतात. त्याचबरोबर काही विद्यार्थी नियमित (Regular) महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असतात, तर काही जण नोकरी करत असतात. अशा विद्यार्थ्यांना वेळेअभावी नियमित वर्गांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. ही गरज लक्षात घेऊन YCM Education मार्फत तुम्ही प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी घरबसल्या ऑनलाइन क्लासेस उपलब्ध करून दिले जातात. अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विषयांचे सविस्तर अध्यापन, शंकानिरसन आणि परीक्षेची प्रभावी तयारी करून दिली जाते.

आमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक यशासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे आहे. अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजावून सांगणे, परीक्षेची तयारी करून घेणे आणि विषयातील संकल्पना सोप्या पद्धतीने शिकविणे यावर आम्ही भर देतो.

आमच्याकडे खालील अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन classes वर्ग उपलब्ध आहेत:

बी.ए. (B.A.) बी.कॉम. (B.Com.) एम.ए. (M.A.) एम.कॉम. (M.Com.) एम.एस्सी. (M.Sc.)

आमची वैशिष्ट्ये

✅ अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक
✅ थेट (Live) ऑनलाइन वर्ग
✅ रेकॉर्डेड लेक्चर्सची सुविधा
✅ अभ्यासक्रमानुसार सविस्तर मार्गदर्शन
✅ परीक्षा तयारी तसेच home assignment साठी विशेष सत्रे
✅ विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
✅ घरबसल्या शिक्षणाची सुविधा

YCM Education मध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनासह शिक्षण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तुमच्या शैक्षणिक प्रवासात आम्ही तुमचे विश्वासू सहकारी आहोत